29-11-20    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   23.01.87  ओम शान्ति   मधुबन


"यशस्वी ताऱ्यांचे गुण वैशिष्ट"


आज ज्ञानसूर्य, ज्ञानचंद्र आपल्या चमकणाऱ्या तारामंडळ ला पहात आहेत. ते तारे आकाशातील आहेत, आणि तुम्ही तारे धरतीचे तारे आहात, ते सृष्टीचे सत्ताधीश आहेत, तुम्ही परमात्म्याचे तारे आहात. ते तारे रात्रीच प्रकट होतात तुम्ही आत्मिक तारे, ज्ञान तारे, चमकणारे तारे, ब्रह्माच्या रात्री प्रकट होतात, ते तारे रात्रीचा दिवस करू शकत नाहीत. फक्त सूर्य रात्रीचा दिवस करतो. परंतु तुम्ही तारे ज्ञानसूर्य, ज्ञानचंद्राच्या बरोबरीने रात्रीला दिवस करतात. जसे सृष्टीच्या तारामंडळा मध्ये अनेक प्रकारचे तारे चमकत असतात तसे परमात्म्याच्या तारामंडळा मध्ये अनेक प्रकारचे तारे चमकताना दिसतात़. काही जवळचे तारे आहेत, तर काही दूरवरचे आहेत. काही यशस्वी तारे आहेत तर काही नवनिर्वाचित आहेत. काही एक स्थितीवाले आहेत. व काही अस्थिर आहेत. ते स्थान बदलतात तर आत्मे स्थिती बदलतात. जसे सृष्टीच्या तारामंडळात धूमकेतू देखील असतात म्हणजेच प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक कार्यात हे का? असे प्रश्न विचारणारे शेपूटधारी म्हणजेच प्रश्न करणारे धूमकेतू आहेत. ज्याप्रमाणे सृष्टीतील धूमकेतू सृष्टीवर प्रभावशील मानले जातात. त्याच प्रमाणे वारंवार प्रश्न विचारणारे ब्राह्मण परिवारातील वायुमंडळ प्रभावशील करतात. सर्व अनुभवी आहात. तेव्हा स्वतः प्रति देखील संकल्पात का? काय? याची शेपूट लावतात तेव्हा मन आणि बुद्धीची स्थिती प्रभावशील बनते. त्याच बरोबर कोणत्याही संघटनांमध्ये किंवा सेवेच्या कार्याप्रती काय? का? असे कसे? हे प्रश्नचिन्ह लावतात. तेव्हा त्या संघटनेचे वातावरण म्हणजे एक प्रकारचे ओझे बनते किंवा स्वतः प्रति, संघटन किंवा सेवे प्रति प्रभाव पडतो. सृष्टीतील तारे जेव्हा वरतून खाली पडतात तेव्हा काय बनतात? दगड!परमात्म तारे सुद्धा जेव्हा संबंध किंवा स्व धारणेच्या उच्च स्थितीतून खाली येतात तेव्हा दगड बुद्धी बनतात. कसे दगडाच्या बुद्धीचे बनतात? ज्याप्रमाणे दगडाला कितीही पाणी टाकले तरी देखील दगड विरघळत नाही. रूप बदलते परंतु विरघळत नाही. दगड कोणतीच गोष्ट धारण करू शकत नाही. असेच जेव्हा दगडाच्या बुद्धीचे बनतात तेव्हा त्यावेळी कितीही कोणीही चांगल्या गोष्टीची जाणीव करून दिली तरीदेखील त्याची जाणीव होत नाही. कितीही ज्ञानाचे जल टाकले तरी देखील बदलत नाहीत, गोष्टी बदलत राहतील परंतु स्वतः बदलत नाहीत, यालाच दगडाच्या बुद्धीचे म्हणतात. तेव्हा आपणच आपल्याला विचारा या परमात्म तारा मंडळामध्ये मी कोणता तारा आहे? सर्वश्रेष्ठ तारा हा यशस्वी तारा असतो. यशस्वी तारा म्हणजेच जो सदैव स्वतःच्या प्रगतीमध्ये सफलतेचा अनुभव करत राहतो. म्हणजेच आपल्या पुरुषार्थाच्या विधीमध्ये तर सदैव सहजतेने यशस्वी अनुभव करत असतो. यशस्वी तारे संकल्पात देखील स्वतःच्या पुरुषार्था प्रति कधीच "माहित नाही ", "हे होईल की नाही", "हे करू शकेल की नाही", हे अयशस्वी चे संकल्प करणार नाहीत. जसा सुविचार आहे "यश हा जन्मसिद्ध अधिकार आहे "असेच ते स्व प्रति सदैव सफलतेच्या अधिकाराच्या रूपात अनुभव करतील. अधिकाराची व्याख्या म्हणजे मेहनती शिवाय, मागण्याशिवाय जे प्राप्त होते ते, सहज आणि स्वतः प्राप्त होते त्याला अधिकार म्हणतात. असेच एक-स्वतः प्रति सफलता तर दुसरी-आपल्या संबंध संपर्कात येणारे मग ते ब्राह्मण असो किंवा लौकिक परिवारातील सर्व संबंध संपर्कातील, संबंधात येणारे संपर्कात येताना कितीही अवघड गोष्ट असो सहजतेचा अनुभव करतील, म्हणजेच यशाच्या प्रगतीमध्ये पुढे जात राहतील. हा! वेळ लागेल परंतु यशाचा अधिकार प्राप्त होईल. असे स्थूल कार्य किंवा अलौकिक सेवाकार्य म्हणजेच दोन्ही क्षेत्रांमध्ये कर्माची सफलता, कर्माच्या सफलतेचे निश्चय बुद्धी विजयी राहतील. कुठे-कुठे परिस्थितीशी तोंड द्यावे लागेल. लोकांद्वारे देखील सहन करावं लागेल परंतु ते सहन करणं प्रगतीचा रस्ता बनेल. परिस्थितीला तोंड देऊन, परस्थितीच स्वस्थीतिच्या उडत्या कलेचे साधन बनेल. अर्थात प्रत्येक गोष्टीमध्ये यश स्वतः आणि अवश्य प्राप्त होईल.

यशस्वी तार्‍याची विशेष निशाणी आहे-तो कधीच स्वतःच्या यशाचा अभिमान करणार नाही, वर्णन करणार नाही, स्वतःचे गीत गाणार नाही परंतु जेवढे यश तेवढी नम्रता, निर्माण व निर्मळ स्वभावाचा असेल. आणि दुसरे त्याचे गीत गातील परंतु तो स्वतः बाबांचे गीत गाईल. यशस्वी तारा कधीच प्रश्न निर्माण करणार नाहीत. सदैव बिंदू रूपात, स्थिर राहून प्रत्येक कार्यात इतरांच्या देखील ड्रामाला(नाटकाला)बिंदू रुपाची आठवण करून देईल. विघ्नविनाशक बनेल, समर्थ बनवून यशाच्या जवळ घेऊन जाईल. सफलतेचा तारा कधीच लौकिक यशाच्या प्राप्तीला पाहून प्राप्तीच्या स्थितीत खूप आनंदी आणि आणि परिस्थिती आली किंवा प्राप्ती कमी झाली तर दुःखी होईल, अशा परिवर्तनाच्या स्थितीमध्ये येणार नाही. सदैव असीम यशस्वी मुर्त राहतील. एकरस, एक श्रेष्ठ स्थितीमध्ये स्थिर राहतील. खुशाल बाहेरील परस्थिती किंवा कार्यात इतरांना असफलतेचा अनुभव होईल परंतु सफलतेचा तारा या स्थितीच्या प्रभावात न येता यशस्वी स्वस्थिती द्वारे यशात परिवर्तन करेल. ही यशस्वी ताऱ्यांची विशेषता आहे. आता स्वतःला विचारा मी कोण आहे? फक्त पात्र आहे की यशस्वी स्वरूप आहे? पात्र बनणे देखील चांगले आहे परंतु फक्त पात्र म्हणून चालणे, प्रत्यक्ष यशाचा अनुभव न करणे, यामध्ये कधी शक्तिशाली, कधी नाराज असा वर-खाली होण्याचा अनुभव करतात. जसे कोणत्याही गोष्टी मध्ये जास्त वर खाली होतात तेव्हा थकवा येतो ना! तर यामुळे देखील चालता-चालता थकव्याचा अनुभव नाराज बनवतो. तेव्हा ना ऊमेदी पेक्षा पात्र बनणे योग्य आहे मात्र सफलतेचा अनुभव करणारे सदैव श्रेष्ठ आहे. अच्छा! तारा मंडळाची कहाणी ऐकली? फक्त मधुबनचा हाँल तारामंडळ नाही तर सर्व ब्राह्मण परिवार तारामंडळ आहे. अच्छा!

सगळे येणारे नवीन मुलं, नवीन मुले नवीनही आहेत आणि जुनी ही आहेत, कारण अनेक कल्पाचीआहेत, त्यामुळे अति जुने देखील आहेत, तर नवीन मुलांचा उमंग उत्साह, मिलन साजरा करण्याचा उत्साह नाटकाच्या नोंदीप्रमाणे पूर्ण झाला. खूप उत्साह राहिला ना!इतका आनंद आहे की बाबांच्या सुचना (डायरेक्शन) देखील ऐकत नाहीत. बाबांच्या भेटीच्या मस्ती मध्ये मस्त आहात का? किती सांगितले-थोडेजण या, कमी या तर कोणी ऐकले का? बापदादा नाटकाच्या प्रत्येक दृश्याला पाहून हर्षित होत आहेत, की इतक्या सर्व मुलांना यायचेच होते, म्हणून आले. सगळं सहज मिळत आहे ना? अवघड तर काही नाही ना? ही ड्रामा अनुसार वेळे प्रमाणे तालीम होत आहे . सगळे खुश आहात ना? अवघडही सहज बनवणारी आहात ना? प्रत्येक कार्याला सहयोग द्या, जे डायरेक्शन मिळते आहे त्यात सहयोगी बना, अर्थात सहज बनवणे. जर सहयोगी बनलात तर ५००० ही सामावून जातात आणि सहयोगी नाही बनलात, अर्थात विधीपूर्वक चालले नाही तर 500 देखील सामावून घेऊ शकत नाही, त्यामुळे दादीनां आपले असे, रेकॉर्ड दाखवा ज्यामुळे सगळ्यांच्या हृदयातून हेच निघेल की ५०००, पाचशे जणां सारखे सामावलेले आहेत. यालाच म्हणतात कठीणही सहज करणे. तर सगळ्यांनी आपले रेकॉर्ड खूप चांगले केले आहे ना? प्रमाणपत्र चांगले मिळत आहे. असेच सदैव आनंदी राहा आणि आनंदी करा. तर सदैव टाळ्या वाजवत राहाल. चांगलं रेकॉर्ड आहे त्यामुळे दोन वेळा भेट झाली आहे. हा नवीन मुलांचा पाहुणचार नाटकानुसार होत आहे. अच्छा!

सदैव आत्मिक श्रेष्ठ यशस्वी ताऱ्यांना, सदैव एकरस स्थितीद्वारे विश्वाला प्रकाशित करणारे, ज्ञानसूर्य, ज्ञानचंद्रा बरोबर राहणारे, सदैव अधिकाराच्या निश्चयाने धुंदीत आणि नम्र स्थितीमध्ये राहणारे, असे परमात्म तारामंडळाच्या सर्व चमकणाऱ्या ताऱ्यांना, ज्ञानसूर्य, ज्ञानचंद्र बापदादांची आत्मिक स्नेह संपन्न प्रेमपूर्ण आठवण आणि नमस्कार.

पार्टि सोबत मुलाखत:-

(1) स्वतःला सदा निर्विघ्न विजय रत्न समजतात का? विघ्न येणे ही तर खूप चांगली गोष्ट आहे परंतु विघ्नांपासून पराभूत होऊ नका. विघ्न येणे अर्थात सदैव मजबूत बनने. विघ्नांना एक मनोरंजन अथवा खेळ समजून पार करा. यालाच म्हणतात निर्विघ्न विजयी. तर विघ्नांना घाबरत तर नाही ना? तेव्हा बाबांची साथ आहे तर घाबरण्याची गरजच नाही. एकटे असाल तर घाबरता, परंतु बरोबर कोणी असेल तर घाबरणार नाही बहादुर बनता. तर जेथे बाबांची साथ आहे तेथे विघ्नांना घाबरण्याची गरज नाही. सर्वशक्तिमान बाबां समोर विघ्न काय आहेत? काहीच नाही, म्हणून विघ्न खेळ वाटतो. अवघड नाही. विघ्न अनुभवी आणि शक्तिशाली बनवतात. जे सदैव बाबांच्या आठवणीत किंवा सेवेमध्ये व्यस्त असतील ते निर्विघ्न राहतील. जर बुद्धी व्यस्त नसेल तर माया व विघ्न येतील. जर व्यस्त राहाल तर माया देखील बाजूला जाईल. येणार नाही निघून जाईल. माया देखील जाणते की हा माझा साथीदार नाही, परमात्म्याचा साथीदार आहे तर बाजूला निघून जाईल. अनंत वेळा विजय बनलेले आहात, म्हणून विजय प्राप्त करणे खूप मोठी गोष्ट नाही. जे काम अनेक वेळा केलेले आहे ते सहज वाटते. तर अनेक वेळा विजयी व नेहमी आनंदी राहणारे आहात ना? माता सदैव खुश राहतात ना? कधी रडत नाहीत ना? पांडव मनात तर रडत नाहीत ना? "काय झालं", "का झालं" असं रडगाणं तर गात नाही ना? बाबांचे बनून देखील सदैव खुश राहत नसतील तर कधी आनंदात राहाल? बाबांचे बनणे म्हणजे सदैव आनंदात राहणे. ना दु:ख आहे, ना दुःखात रडणं आहेे. सगळं दुःख दूर झालेलं आहे. तर आपल्या या वरदानाला सदैव लक्षात ठेवा. अच्छा!

(2) स्वतःला या आत्मिक बागेतील आत्मिक गुलाब समजतात का? ज्याप्रमाणे सर्व फुलांमध्ये गुलाबाचं फूल त्याच्या सुगंधाच्या कारणांने सर्व प्रिय असते. तर तो आहे गुलाब आणि आपण सगळे आत्मिक गुलाब. आत्मिक गुलाब अर्थात ज्याच्या मध्ये सदैव आत्मिक सुगंध आहे. आत्मिक सुगंध असणारे कोठेही पहा, कुणालाही पहा तर आत्म्याला पाहा, शरीराला नाही. स्वतःही आत्मिक स्थितीत राहतील आणि दुसऱ्यांनाही पाहतील. यालाच म्हणतात आत्मिक गुलाब. हा बाबांचा बगीचा आहे. ज्याप्रमाणे बाबा उच्च ते उच्च आहेत, त्याप्रमाणे बाग देखील उच्च ते उच्च आहे. बागेचा विशेष शृंगार आत्मिक गुलाब- आपण सगळे आहात आणि हा आत्मिक सुगंध अनेक आत्म्यांचे कल्याण करणार आहे.

आज विश्वामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्याचे कारण हेच आहे की एकमेकांना आत्मिक दृष्टीने पाहत नाहीत. देह अभिमानाच्या कारणांनी सर्व समस्या निर्माण झाल्या आहेत. देही अभिमानी बनलात तर सर्व समस्या समाप्त होतील. तर तुम्ही आत्मिक गुलाब विश्वावर आत्मिक सुगंध पसरवण्याच्या निमित्त आहात. तर अशा धुंदीत राहतात का? कधी एक, कधी दुसरा नाही ना? एकच स्थितीमध्ये शक्ती असते, स्थिती बदलल्याने शक्ती कमी होते. सदैव बाबांच्या आठवणीत राहून जेथेही सेवेचे साधन आहे, संधी घेऊन पुढे जात राहा. परमात्म बागेचे आत्मिक गुलाब समजून आत्मिक सुगंध पसरवत रहा. किती गोड आत्मिक सुगंध आहे ज्या सुगंधाला सर्वजण घेऊ इच्छितात. हा आत्मिक सुगंध अनेक आत्म्यांबरोबरच आपलेही कल्याण करतो. बापदादा पहात आहेत की, किती आत्मिक सुगंध कुठे-कुठे पसरवत आहेत. थोडा जरी देह अभिमान मिक्स झाला तर आपला नैसर्गिक सुगंध राहणार नाही. सदैव या आत्मिक सुगंधा बरोबर इतरांनाही सुगंधी बनवा. सदैव अचल आहात का? कोणतीही हालचाल हलवत तर नाही ना? काहीही होऊ द्या, ऐकताना, पाहताना थोडे देखील हलचलमधे येत नाही ना? जर नथिंग न्यू( कोणतीही गोष्ट नवीन नाही)आहे तर हलचलमधे का यावे? एखादी नवीन गोष्ट असेल तर हलचल आहे. हे "का" "काय" अनेक कल्प झाले आहेत, यालाच म्हणतात ड्रामा वर(नाटकावर) निश्चिय. सर्वशक्तिमान बाबा सोबत आहे म्हणून चिंतामुक्त बादशाह आहात. सगळी काळजी बाबांना दिल्याने स्वतः सदैव चिंतामुक्त बादशहा आहात. सदैव आत्मिक सुगंध पसरवत रहा तर सर्व विघ्न संपून जातील.

वरदान:-
प्रत्यक्षतेच्या वेळेला जवळ आणणारे सदैव शुभचिंतक आणि स्वचिंतक भव.

सेवेमध्ये यशाचा आधार आहे शुभचिंतक वृत्ती कारण आपली ही वृत्ती आत्म्यांची ग्रहणशक्ती किंवा जिज्ञासा वाढवते, त्याने वाणीची सेवा सहज सफल होते, आणि स्व प्रति स्वचिंतन करणारी स्वचिंतक आत्मा सदैव माया प्रूफ, कुणाच्याही कमजोरीला ग्रहण करण्यापासून, व्यक्ती व वैभवाच्या आकर्षणा पासून प्रूफ होत जाईल. तर हे दोन्ही वरदान प्रत्यक्ष जीवनात आणल्यास प्रत्यक्षतेचा समय जवळ येईल.

सुविचार:-
आपल्या विचारांनाही अर्पण करा तर सर्व उणीवा स्वतःहून दूर होतील.